दिनेश पवार : विशेष प्रतिनिधी
प्रा. डॉ. अजित भोसले यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची इंग्रजी विषयातील पीएच.डी. पदवी जाहीर झाली आहे. “A Study of Honour Revenge for Justice in the Selected Post-Modern Works of Victimized Women” या विषयावर त्यांनी संशोधन पूर्ण केले.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या प्रा. रामकृष्ण मोरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, आकुर्डी येथील संशोधन केंद्रात त्यांनी हे संशोधन पूर्ण केले. त्यांना प्रा. डॉ. ज्ञानेश्वर शिरोडे यांचे मार्गदर्शन लाभले.
या संशोधनामध्ये चार आत्मकथनांतील पीडित महिलांचा अन्यायाविरुद्धचा संघर्ष, सन्मानासाठीची लढाई आणि न्याय मिळविण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचा अभ्यास करण्यात आला आहे.
प्रा. डॉ. अजित भोसले यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. एकनाथ मुंढे, प्रा. संजय अहिवळे, उपप्राचार्य प्रा. डॉ. दिनकर मुरकुटे, उपप्राचार्य प्रा. डॉ. रंजना जाधव, उपप्राचार्य डॉ. संजय जगताप तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.









