दौंडमध्ये भरदिवसा चोरी; शिवसागर ट्रेडिंगसमोरून १.४० लाखांचा माल गायब

✍🏻योगेश राऊत

दौंड : दुकान समोरून अज्ञात चोरट्याने १ लाख ४० हजार ९०० रुपये किमतीचे सिगारेटचे बॉक्स चोरून नेल्याची घटना सोमवारी (दि. २८) दुपारी पावणेएकच्या सुमारास दौंड शहरातील शिवसागर ट्रेडिंगसमोर घडली. या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सचिन विजय पवार (वय २९, व्यवसाय- खाजगी नोकरी, रा. माळेगाव, ता. बारामती, जि. पुणे) यांनी दौंड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सचिन पवार हे कामानिमित्त मौजे दौंड येथील शिवसागर ट्रेडिंग या दुकानासमोर आले असता, अज्ञात चोरट्याने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी लबाडीच्या उद्देशाने तेथे ठेवलेला माल चोरून नेला. यामध्ये १ लाख ४० हजार ९०० रुपये किमतीचे ‘मार्लबोरो ॲडव्हान्स’ सिगारेटचे ३२ बॉक्स (एकूण ६४० पॅकेट्स) चोरीला गेले आहेत.
या घटनेची नोंद दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ७२०/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अंतर्गत करण्यात आली आहे. सहाय्यक फौजदार साबळे यांनी हा गुन्हा दाखल करून घेतला असून, पुढील तपास पोलीस हवालदार बोराडे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Traffic Tail