प्रा. विजय जाधव यांना भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

योगेश राऊत

शैक्षणिक, सामाजिक आणि संशोधन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल; दौंड तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव

पाटस (ता. दौंड) येथील सुभाष अण्णा कुल शिक्षणशास्त्र महाविद्यालयात गेल्या १३ वर्षांपासून अध्यापनाचे कार्य करणारे प्रा. विजय जाधव यांना शैक्षणिक, सामाजिक आणि संशोधन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शुक्रवार, दि. १६ ऑक्टोबर २०२६ रोजी शिक्रापूर (ता. शिरूर) येथील कस्तुरी शिक्षणशास्त्र महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

भारतीय समाज सेवा संस्था, भारत यांच्या विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात कस्तुरी शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या अध्यक्षा डॉ. सौ. जयश्रीताई पलांडे यांच्या हस्ते प्रा. विजय जाधव यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या वेळी विविध शैक्षणिक क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाला भारतीय समाज सेवा संस्थेचे सचिव डॉ. गोरख साठे, यशवंतराव चव्हाण विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंडित पलांडे, डॉ. सागर काकडे, डॉ. राजेंद्र पाटील, प्रा. कैलास महानोर आणि प्रा. मनिषा कैवठाळे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

प्रा. विजय जाधव हे पाटस येथील सुभाष अण्णा कुल शिक्षणशास्त्र महाविद्यालयात गेल्या १३ वर्षांपासून अध्यापनाचे कार्य करीत आहेत. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याबरोबरच शैक्षणिक क्षेत्रातील योगदान, सामाजिक कार्यातील सहभाग आणि संशोधन क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

शिक्षण क्षेत्रात सातत्याने कार्यरत राहून ज्ञानदानाची जबाबदारी पार पाडणाऱ्या प्रा. जाधव यांच्या या सन्मानामुळे पाटससह दौंड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या यशाबद्दल दौंड तालुक्यातील विविध संस्था आणि मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

पाटस ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच स्वप्निल भागवत यांनीही प्रा. विजय जाधव यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक आणि सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यांच्या या सन्मानामुळे शिक्षण क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रेरणा मिळेल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Traffic Tail