माजी सरपंच ज्योती जाधव यांना मातृशोक; वयाच्या ७५व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
संपादक – योगेश राऊत
श्रीगोंदा येथील द्वारकाबाई दत्तात्रय शिंदे (वय ७५) यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्या कानगावच्या माजी सरपंच ज्योती विजय जाधव यांच्या मातोश्री होत्या.
द्वारकाबाई शिंदे यांच्या पश्चात एक मुलगा, चार मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने कुटुंबीयांनी आपल्या प्रिय व्यक्तीला गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.
त्यांच्या निधनाची बातमी समजताच नातेवाईक, मित्रपरिवार तसेच परिसरातील नागरिकांकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे. शिंदे व जाधव कुटुंबीयांच्या दुःखात परिसरातील नागरिक सहभागी झाले आहेत.









