ओंकार नामदेव सांगळे बेपत्ता; शोध घेण्याचे आवाहन

योगेश राऊत

पुणे : ओंकार नामदेव सांगळे (वय १७) हा दि. १७ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ५.५५ वाजता क्लासला जाण्यासाठी घरातून बाहेर पडला. मात्र, तो अद्याप घरी परतला नसल्याने त्याचा शोध घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ओंकार घरातून बाहेर पडताना त्याने पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट, काळ्या रंगाची जीन्स आणि पांढऱ्या रंगाचे क्रॉक्स घातले होते. तो पुण्यातील राजभवन परिसरातून निघाल्याची माहिती देण्यात आली आहे.

ओंकार कुठे आढळल्यास किंवा त्याच्याबाबत काही माहिती मिळाल्यास नागरिकांनी त्याचे वडील नामदेव सांगळे यांच्याशी ९९८७३९८७४० या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

ओंकारबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास ती तातडीने कुटुंबीयांना किंवा जवळच्या पोलीस ठाण्याला कळवावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Traffic Tail