सामाजिक कार्याची दखल; गणेश जाधव यांना राज्यस्तरीय ‘समाजभूषण पुरस्कार’ प्रदान

सोरतापवाडी येथे साप्ताहिक महाराष्ट्राची भूमीच्या वतीने गुणगौरव सोहळा; मान्यवरांच्या हस्ते सन्मान

योगेश राऊत

सोरतापवाडी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत समाजाप्रती आपली बांधिलकी जपणारे श्री. गणेश जाधव यांना राज्यस्तरीय ‘समाजभूषण पुरस्कार २०२६’ प्रदान करून गौरविण्यात आले. साप्ताहिक महाराष्ट्राची भूमीच्या वतीने आयोजित विविध क्षेत्रांतील राज्यस्तरीय गुणगौरव पुरस्कार सोहळ्यात त्यांचा हा सन्मान करण्यात आला. सोरतापवाडी येथील शांताई लॉन्स येथे हा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

समाजातील विविध घटकांसाठी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या योगदानाची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे श्री. गणेश जाधव यांची समाजभूषण पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. तसेच फेटा बांधून त्यांचा गौरव करण्यात आला.

समाजसेवा ही केवळ प्रसिद्धी किंवा सन्मान मिळविण्यासाठी नसून समाजाप्रती असलेल्या कर्तव्यभावनेतून केली जाणारी जबाबदारी आहे. याच भावनेतून केलेल्या त्यांच्या कार्याची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आल्याने त्यांच्या कार्याचा गौरव झाला आहे. या सन्मानामुळे सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या इतरांनाही प्रेरणा मिळणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

या कार्यक्रमाला संस्थापक अध्यक्ष श्री. आनंदा (आण्णा) नंदू बारवकर यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी व विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी ग्रामविकास फाउंडेशन व पाटस व्यापारी संस्थेचे संस्थापक विनोद कुरुमकर पाटस व्यापारी संस्थेचे माजी अध्यक्ष राजूशेठ गोसावी, मार्गदर्शक जुनेद तांबोळी, विद्यमान अध्यक्ष नानासाहेब म्हस्के, उपाध्यक्ष श्रीकांत शितोळे, फाउंडेशनचे सचिव रिजवान शेख यांच्यासह वाचक, हितचिंतक, पत्रकार आणि व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गणेश जाधव यांना मिळालेल्या या राज्यस्तरीय सन्मानाबद्दल उपस्थित मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Traffic Tail