पाटस टोल प्लाझावर गणरायाला भावपूर्ण निरोप महाप्रसाद व श्री सत्यनारायण महापूजेनंतर ढोल-ताशांच्या गजरात गणेशमूर्तीचे विसर्जन

 

 संपादक – योगेश राऊत

 

पाटस : पुणे-सोलापूर एक्सप्रेस वे प्रायव्हेट लिमिटेडच्या पाटस टोल प्लाझावर सालाबादप्रमाणे यंदाही गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. गणपती विसर्जनाच्या आदल्या दिवशी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करून गणरायाच्या चरणी भक्तिभावाने पूजा-अर्चा करण्यात आली.

 

श्री सत्यनारायण महापूजेसाठी टोल प्लाझाचे मॅनेजर प्रवीण कांबळे व त्यांच्या पत्नी विधिवत पूजेसाठी बसले होते. यावेळी अधिकारी, कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी उपस्थित राहून गणरायाचे दर्शन घेतले. महापूजेनंतर उपस्थितांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

 

दरम्यान, दुसऱ्या दिवशी गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. ढोल-ताशांच्या गजरात तसेच उत्साहपूर्ण वातावरणात गणेशमूर्तीची मिरवणूक काढण्यात आली. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत गणरायाच्या विसर्जन सोहळ्यात आपली उपस्थिती नोंदवली.

 

या विसर्जन सोहळ्यासाठी एचआर मॅनेजर राजेश सिंग, मेंटेनन्स मॅनेजर सुरजित सिंग, सिस्टीम मॅनेजर अभिजीत शिंगारे, प्लाझा मॅनेजर प्रवीण कांबळे,पुणे सोलापूर एक्सप्रेस वे चे लीगल ॲडव्हायझर ऍडव्होकेट योगेश सरोदे,सेफ्टी ऑफिसर वसीम शेख, गुलाब शेख, इलेक्ट्रिकल इंजिनिअर रोहित क्षीरसागर, भगत देवरे, भरत साबरे,शुभम मिसाळ, स्वागत गायकवाड,विलास मोलावडे, राहुल चव्हाण, संदीप कुलट, श्रीपाद शिंदे, प्रशांत नवले,गोरख काळे, लाला काळे, नवनाथ वायसे, महेश निंबाळकर, रमेश बारवकर, यांच्यासह कंपनीचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

गणेशोत्सवाच्या माध्यमातून अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये एकोपा, सामाजिक बांधिलकी आणि भक्तिभावाची भावना दृढ होत असल्याचे यावेळी दिसून आले. उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात गणरायाला निरोप देत गणेशोत्सवाची सांगता करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Traffic Tail