सुवर्णा विष्णू रणधीर यांच्या प्रथम पुण्यदिनानिमित्त वृक्षारोपण; नवीन समाज मंदिर परिसरात सामाजिक उपक्रम

वरवंड | प्रतिनिधी

 

दौंड तालुक्यातील वरवंड येथे सुवर्णा विष्णू रणधीर यांच्या प्रथम पुण्यदिनानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. नितीन रणधीर यांच्या पुढाकारातून नवीन समाज मंदिर, वरवंड परिसरात हा उपक्रम पार पडला.

 

सुवर्णा विष्णू रणधीर यांच्या स्मृतींना अभिवादन करत त्यांच्या प्रथम पुण्यदिनानिमित्त परिसरात विविध वृक्षांची लागवड करण्यात आली. वाढत्या पर्यावरणीय समस्यांच्या पार्श्वभूमीवर वृक्षारोपणासारख्या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

 

या वेळी उपस्थितांनी वृक्षांचे संगोपन आणि संवर्धन करण्याचा संकल्प केला. स्मृतिदिनानिमित्त केवळ श्रद्धांजली न वाहता समाज आणि पर्यावरणाच्या हितासाठी उपक्रम राबविण्याचा हा प्रयत्न परिसरातून कौतुकास्पद ठरत आहे.

 

वृक्षारोपण कार्यक्रमाच्या माध्यमातून सुवर्णा विष्णू रणधीर यांच्या स्मृती जपण्याबरोबरच पुढील पिढीसाठी हिरवाईचा ठेवा निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Traffic Tail