कुरकुंभ प्रतिनिधी : सुरेश बागल
दौंड तालुक्यातील पांढरेवाडी येथे दि. ०३. १०. २०२६ शनिवार रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांनी महाराष्ट्र शासन नवीन परिपत्रक जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन अर्थात आजी – आजोबा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतल्याने शाळेमध्ये शालेय मुलांनी या कार्यक्रमासंदर्भात आपले आजी – आजोबा बोलावले होते.या कार्यक्रमाला शालेय मुला-मुलींनी आपल्या आजी आजोबाना ओवाळून स्वागत करून आजी आजोबांचे दर्शन घेतले. शालेय मुलांनी दैनंदिन जीवनात आजी आजोबा विषयी आठवणी सांगितल्या तशी ही संस्कृती जतन करण्यासाठी व पुढच्या पिढीला संस्कार मिळावे असे उद्देशाने या कार्यक्रमाचे बरेचसे ठिकाणी कौतुक व स्वागत करण्यात आले. यानंतर आपल्या कुटुंबामध्ये आजी – आजोबांनी येणारे प्रसंग सांगून आपल्या भावना व्यक्त केल्या तसेच या कार्यक्रमांमध्ये आजी-आजोबांचा सन्मान केल्याने आजी – आजोबा यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य दिसत होते. या कार्यक्रमास पांढरेवाडी गावचे पोलीस पाटील विलास येचकर, माजी सरपंच मोहन बनकर, ज्येष्ठ व्यक्तिमत्व बाजीराव शितोळे, व मोठ्या संख्येने आजी – आजोबा व सर्व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना छाया साळवे यांनी केली. सूत्रसंचालन महेंद्र भोसले यांनी केले. आभार मच्छिंद्र रामगुडे यांनी मानले.









