यवत येथे महिला शेतकरी प्रमाणपत्र नोंदणी शिबिर उत्साहात संपन्न

यवत प्रतिनिधी – संदीप भालेराव 

दिनांक ९ ऑक्टोबर रोजी यवत येथे महिला शेतकऱ्यांसाठी विशेष ‘महिला शेतकरी प्रमाणपत्र नोंदणी’ शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. महिला शेतकऱ्यांना शासनाच्या विविध कृषी योजनांचा थेट लाभ मिळावा व त्यांना प्रशासकीयदृष्ट्या सक्षम करता यावे, या उद्देशाने या पालखी तळ यवत येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या प्रसंगी यवतचे कृषी अधिकारी श्री. सुरज बाबर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “शेती क्षेत्रात महिलांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असून, महिला शेतकरी प्रमाणपत्रामुळे त्यांना शासकीय अनुदान, कर्ज योजना आणि विविध कृषी उपक्रमांत प्राधान्य मिळण्यास मदत होईल.”

या शिबिरास तालुका कृषी अधिकारी, दौंड मंडळ कृषी अधिकारी यवत, उपकृषी अधिकारी यवत यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच सहायक कृषी अधिकारी सुरज बाबर यांच्यासह अक्षय भालेराव, राहुल बिचुकले, ,ऋग्वेदी कदम,

शाझिया शेख, राहुल काटम,मंजिरी भागवत आणि प्रगतशील शेतकरी रविराज ढगे आदी मान्यवर व अधिकारी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी महिला शेतकऱ्यांना नोंदणी प्रक्रियेची माहिती देऊन अर्ज भरून घेण्यास मार्गदर्शन केले.

या शिबिराला यवत व परिसरातील महिला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. परिसरातील अनेक महिला शेतकऱ्यांनी या शिबिराचा लाभ घेत आपली नोंदणी पूर्ण केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Traffic Tail