दिनेश पवार : विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ व एस. एम. जोशी कॉलेज मधील मराठी विभाग व इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी विश्वकोश नोंदलेखन व सारांश मांडणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पुण्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज, औंध, महात्मा फुले महाविद्यालय, पिंपरी आणि एस. एम. जोशी कॉलेज, हडपसर या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्पर्धेत ज्युनिअर व सिनिअर महाविद्यालयातील अनुक्रमे प्रत्येकी २ प्रमाणे ६ गट व प्रत्येकी ३ प्रमाणे ९ अशा १५ गटात ४५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्रत्येक गटासाठी नोंदवाचन व सारांश मांडण्यासाठी १० मिनिटांचा अवधी देण्यात आला होता. यामध्ये एस. एम. जोशी कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी कनिष्ठ गटात द्वितीय व तृतीय, तसेच वरिष्ठ गटात प्रथम व उत्तेजनार्थ बक्षिसे मिळविली. रोख रक्कम, पुस्तक व प्रमाणपत्र असे बक्षिसांचे स्वरूप होते.
यावेळी परीक्षक म्हणून ज्येष्ठ साहित्यिक रविराज सोनार, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या श्रीमती वर्षा बडे व विद्याव्यासंगी सहायक आनंद गेडाम यांनी काम पाहिले. त्यांना श्रीमती विनोदिनी शिगवण यांनी सहकार्य केले.
स्पर्धा विजेतेपद पुढील विद्यार्थ्यांना मिळाले..
ज्युनिअर कॉलेज गटात खालील स्पर्धकांनी पारितोषिके मिळविली. प्रथम क्रमांकाचे पारितोषिक- रु. 3000/- डॉ बाबासाहेब आंबेडकर कॉलेज, औंध, पुणे निकिता तळपे, प्रांजली चव्हाण व साफिया शेख द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक – रु.2100/- एस. एम. जोशी कॉलेज, हडपसर, पुणे शर्वरी चौधरी व अनुष्का पाटील तृतीय क्रमांकाचे पारितोषिक रु.1500/- एस. एम. जोशी कॉलेज, हडपसर, पुणे समर्थ विभुते व श्रावणी कदम
सिनिअर कॉलेज गटात खालील स्पर्धकांनी पारितोषिके मिळविली. प्रथम क्रमांकाचे पारितोषिक- रु. 3000/- एस. एम. जोशी कॉलेज, हडपसर, पुणे अनुष्का गारडे, रेणुका माने व वैभवी भोंडवे द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक – रु.2100/-
महात्मा फुले कॉलेज, पिंपरी, पुणे प्रांजल सोनकांबळे, प्रतिभा शिरसाठ व शुभम माने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक रु.1500/-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज, औंध, पुणे विशाल दांडे, गणेश गायकवाड व शितल घुगे उत्तेजनार्थ क्रमांकाचे पारितोषिक- रु. 900/- एस. एम. जोशी कॉलेज, हडपसर, पुणे
अश्विनी गर्जे, आरती जगदाळे व दुर्गा कड यांनी मिळविले.
स्पर्धेतील विजेत्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो.डॉ. एकनाथ मुंढे, उपप्राचार्य प्रो.डॅा. दिनकर मुरकुटे, उपप्राचार्य डॉ. संजय जगताप व आयक्युएसी समन्वयक प्रा. संजय अहिवळे व मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. या संपूर्ण स्पर्धेचे प्रमुख संयोजन व मार्गदर्शन महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, वाई येथील विद्याव्यासंगी सहायक डॉ. स्नेहा खोब्रागडे यांनी केले. प्रमुख उपस्थितीमध्ये डॉ. शामकांत देवरे, ललित कुडमथे होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.शीतल चौरे व प्रा.अक्षदा दुपटे यांनी तर आभार प्रा. दिपक गायकवाड यांनी केले. डॉ.अतुल चौरे व प्रा. गजानन घोडके यांनी सहकार्य केले. कार्यक्रमांमध्ये विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला









