नंदादेवी कोकणे वस्ती येथे आरओ फिल्टर प्लांटचे उद्घाटन

पुणे सोलापूर एक्सप्रेस वे च्या सीएसआर निधीतून शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा

संपादक – योगेश राऊत

दौंड तालुक्यातील नंदादेवी कोकणे वस्ती येथे पुणे सोलापूर एक्सप्रेस वे च्या सीएसआर (सामाजिक उत्तरदायित्व) निधीतून बसविण्यात आलेल्या आरओ फिल्टर प्लांटचे उद्घाटन मंगळवारी (ता. २०) पाटस टोल प्लाजा चे कर्मचारी नवनाथ वायसे यांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमामुळे वस्तीतील नागरिकांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

नागरिकांना स्वच्छ व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होणे ही आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची बाब आहे. ग्रामीण भागातील नागरिकांची पाण्याची गरज लक्षात घेऊन पाटस टोल प्लाझाच्या सीएसआर निधीतून नंदादेवी कोकणे वस्ती येथे आरओ फिल्टर प्लांट बसविण्यात आला. या प्लांटमुळे स्थानिक नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी उपयुक्त सुविधा उपलब्ध झाली आहे.

उद्घाटनप्रसंगी माजी सरपंच रमेश तात्या कोकणे, टोल कर्मचारी नवनाथ वायसे, दिलीप चव्हाण, अरविंद कोकणे, विकास कोकणे, अनिल मेरगळ, सोनबा कोकणे, आशिष कोकणे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

ग्रामीण भागात मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सामाजिक उत्तरदायित्व निधीतून करण्यात येणारे असे उपक्रम महत्त्वाचे ठरतात. नंदादेवी कोकणे वस्ती येथे उभारण्यात आलेल्या या आरओ फिल्टर प्लांटचा नागरिकांना लाभ होणार असून, पिण्याच्या पाण्याच्या सुविधेत भर पडली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Traffic Tail