केडगाव स्टेशन येथे नवरात्रोत्सवानिमित्त कैलास राजेनिंबाळकर यांचे प्रवचन उत्साहात संपन्न; भाविकांची प्रचंड उपस्थिती

प्रतिनिधी – मिलिंद शेंडगे

केडगाव : येथील हनुमान तरुण मंडळ आणि दौंड तालुका सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबादप्रमाणे यंदाही नवरात्र उत्सवाचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले होते. या उत्सवानिमित्त शनिवार, दि. १७ ऑक्टोबर २०२६ रोजी महालक्ष्मी मंदिरामध्ये ज.न.म. प्रवचनकार कैलास राजेनिंबाळकर यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम अत्यंत भक्तीमय आणि उत्साही वातावरणात पार पडला.

    या प्रवचन सोहळ्यासाठी महालक्ष्मी मंदिरामध्ये भाविकांची प्रचंड उपस्थिती पाहावयास मिळाली. केडगाव स्टेशन परिसरातील ग्रामस्थ, व्यापारी वर्ग, ज्येष्ठ नागरिक, युवक-युवती आणि महिला वर्गाने मोठ्या संख्येने उपस्थित राहून या प्रवचनाचा लाभ घेतला. कैलास राजेनिंबाळकर यांनी आपल्या ओघवत्या वाणीतून केलेल्या मार्गदर्शनाने उपस्थित सर्वच भाविक मंत्रमुग्ध झाले होते.

    या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन व मार्गदर्शन केडगाव स्टेशन सेवा केंद्रातील दौंड तालुका मा. सचिव रामेश्वर वचकल यांनी केले. तसेच हा धार्मिक सोहळा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी केडगाव स्टेशन सेवा केंद्राच्या महिला सचिव योगिता भांडवलकर यांनी विशेष परिश्रम घेत मोलाचे सहकार्य केले.

    याप्रसंगी केडगाव स्टेशन सेवा केंद्रातील विकास शिंदे, किरण शेंडगे, राजश्री मोरे, अनिता शिंदे, निंबाळकर मावशी, हरिभाऊ मोरे, सचिन भांडवलकर, वैभव भुजबळ, कादंबरी मोरे यांसह अनेक कार्यकर्ते व भाविक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सांगतेप्रसंगी प्रवचनकार कैलास राजेनिंबाळकर आणि या कार्यात सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवरांचा यथोचित सत्कार करून आभार व्यक्त करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Traffic Tail